केईएम रुग्णालय रुग्णांच्या नातेवाईंना म्हणते, स्वच्छता राखा

केईएम रुग्णालयाने रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा करून स्वच्छता अभियान चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये ते परिसरात साचलेल्या कचऱ्याचे फोटो देखील शेअर करतील. ज्यामुळे तिथला कचरा लवकरातलवकर उचलला जाईल आणि परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. याचबरोबर रुग्णालयाने रुग्णांच्या नातेवाईकांना स्वच्छता राखण्याची सूचना माक्रोफोनच्या माध्यमातून देण्यास सुरुवात केली आहे.

रुग्णालय परिसरात असलेले उंदीर, भटके कुत्रे आणि मांजर यामुळे रुग्णांना याचा त्रास होतो. त्यामुळे रुग्णालय आणि कर्मचारी स्वच्छता अभियान राबवत आहेत.

'मुंबई मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार केईएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्णांचे नातेवाईक त्या परिसरात घाण करतात. त्यांनी स्वच्छता राखायला हवी. काही दिवसांपूर्वी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उंदराने रुग्णाला चावल्याची घटना घडली होती. त्यानंतर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय. एस. कुंदन यांनी रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्याची विनंती केली होती.


हेही वाचा -

उंदराने खाल्ली लेडीज पर्स !


पुढील बातमी
इतर बातम्या