उंदराने खाल्ली लेडीज पर्स !

 Fort
उंदराने खाल्ली लेडीज पर्स !

सीएसटी - रेल्वेच्या डब्यातून अनेक विनातिकीट प्रवासी प्रवास करत असतात. उंदीर, झुरळे हे त्यातील नियमित प्रवासी. रेल्वेतून प्रवास करताना त्यांचा त्रास इतर प्रवाशांनाही होत असतो. प्रख्यात अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांनाही सोमवारी याचा प्रत्यय आला. देवगिरी एक्सप्रेसने मुंबईत येताना निवेदिता यांची पर्स उंदरांनी कुडतरली.

"मी देवगिरी एक्सप्रेसने निवेदिता मुंबईकडे निघाले होते. ही ट्रेन तब्बल पाच तास उशिराने निघाली. मात्र प्रवासाला सुरुवात होताच डब्यातीव उंदरांनी हैराण केले. उंदरांचा सुळसुळाट अत्यंत त्रासदायक होता. त्यांनी माझी पर्सही कुडतरली", असे निवेदिता यांनी सांगितले.

संपूर्ण प्रवासात त्यांना उंदरांचा उच्छाद सहन करावा लागला. इतर प्रवासीही उंदरांच्या उच्छादाला वैतागले.

या सर्व मनस्तापामुळे कधी एकदा मुंबई येतेय आणि कधी एकदा खाली उतरतोय असे झाल्याची प्रतिक्रिया अनेक प्रवासी व्यक्त करत होते. दरम्यान रेल्वेच्या या ढिसाळ कारभाराबद्दल निवेदिता जोशी-सराफ यांनी संताप व्यक्त केला आहे.

Loading Comments