मिरा-भाईंदरमध्ये कोरोना मृतांमध्ये ५० ते ७० वयोगटातील रुग्ण अधिक

मिरा-भाईंदरमध्ये मंगळवारी कोरोनाचे १६१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता ३३२६ झाली आहे. एकूण मृतांची संख्या १४५ वर गेली आहे.  विशेष म्हणजे एकूण मृतांमध्ये ५० ते ७० वयोगटातील रुग्णांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. 

मिरा-भाईंदर शहरातील मृत्यूचा दर ४ टक्के आहे. मागील आठ दिवसांपासून दररोज सरासरी चारपेक्षा अधिक मृत्यूची नोंद होत आहे. शहरातील कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग कमी होऊन २८ दिवसांवर गेला आहे. या ठिकाणी ३० ते ६० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. कामानिमित्त बाहेर जाणारा, अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारा हा वयोगट आहे. रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. 

मृत्यूचे प्रमाण

वय      मृतांची संख्या

० ते १०       ०

१० ते २०     ०

२० ते ३०     ०

३० ते ४०      ९

४० ते ५०      १९

५० ते ६०      ३०

६० ते ७०      २५

७० ते ८०      २०

८० ते ९०     ०३

९० ते १००     ०१


हेही वाचा -

Mumbai Local: मुंबई लोकलच्या ७०० फेऱ्या, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच

Marathi Compulsory: सरकारी कामकाजात मराठी न वापरल्यास वेतनवाढ रोखणार, ठाकरे सरकारचा निर्णय



पुढील बातमी
इतर बातम्या