महाबळेश्वरमध्ये 'या' वयाच्या पर्यटकांंवर बंदी

देशभरातील प्रवासावरील निर्बंध शिथिल झाल्यानंतर अनेक पर्यटनस्थळं पुन्हा एकदा खुली झाली आहेत. माथेराननंतर महाबळेश्वर देखील पर्यटनासाठी खुलं झालं आहे. पण यासाठी काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधाचं पालन करणं बंधनकारक आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार, महाबळेश्वरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाव्हायरसचा या वयोगटातील नागरिकांना अधिक धोका आहे. हेच लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी हॉटेल्ससाठी देखील नवीन नियमावली देण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात स्थित महाबळेश्वर हा थंड हवेचं ठिकाण आणि स्ट्रॉबेरी यासाठी अधिक ओळखले जाते. याखेरीज हे हिंदूंचे एक पवित्र तीर्थस्थान आहे. कारण इथूनच कृष्णा नदी उगम पावली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासात राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या ८ लाख ४३ हजार ८४४ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत १८ हजार १०५ जणांची पॉझिटिव्ह चाचणी आली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७२.५८ टक्के आहे.

गुरुवारी ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनोव्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत बोलताना सांगितलं की, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या कोरोनोव्हायरस प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे.


हेही वाचा

माथेरान पर्यटकांसाठी बुधवारपासून खुले

लॉकडाऊनमुळं माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला फटका

पुढील बातमी
इतर बातम्या