Advertisement

लॉकडाऊनमुळं माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला फटका

माथेरान येथील पर्यटन व्यवसायाची आर्थिक स्थिती बिघडली आहे.

लॉकडाऊनमुळं माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला फटका
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं सर्वच व्यवसायाला फटका बसला आहे. पर्यटनस्थळालाही मोठा फटका बसला असून, माथेरान येथील पर्यटन व्यवसायाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. माथेरानमधील रहिवाशी मागील ५ महिने सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळं मेटाकुटीला आला आहे. सप्टेंबरपर्यंत हे स्थळ पर्यटकांसाठी खुले झाले नाही, तर भूकबळींची परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे.

कोरोनानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यानं दुकानांचं शटर डाऊन आहे. चपला दुकानातच पडून आहेत. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे त्यांच्यावर बुरशी चढली असून, त्या खराब झाल्या आहेत. त्यामुळं सुमारे २ लाखांचं नुकसान झालं आहे. ७०० हेक्‍टरवर वसलेले माथेरान हे टुमदार पर्यटनस्थळ आहे. मुंबई-पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने या ठिकाणी पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. त्यामुळे स्थानिकांचाच नव्हे तर कर्जत तालुक्‍यातील गावांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटलेला आहे.

५ महिन्यांतील लॉकडाऊनमुळे माथेरानचे आर्थिक गणित कोलमडून पडलं आहे. फक्त पर्यटनावर अवलंबून असलेल्या या गावातील ओझे वाहणाऱ्या हमाल, घोडेवाले, हात रिक्षावाले, दुकानदार, चर्मोद्योजक, चिक्कीवाले, रेस्टॉरंट, लॉजिंग व्यावसायिक यांसह सगळ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. माथेरानचे प्रमुख आकर्षण येथील घोडा आहे. त्यावर रपेट मारण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.

या घोड्यांमुळे येथील ४६० परिवारांचा उदरनिर्वाह चालतो. यामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर घोड्यांचे खाद्य आणि घोडेवाल्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, लॉकडाऊनमुळं घोडे हे तबेल्यात बांधून असल्यामुळे त्यांचे खाद्य व घरखर्च चालविणे मुश्‍किल झाले आहे. 



हेही वाचा -

जी/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू

पदवीदान समारंभासाठी आयआयटीचा परिसर आणि पदवीप्रदान समारंभाचे आभासी वातावरण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा