Advertisement

पदवीदान समारंभासाठी आयआयटीचा परिसर आणि पदवीप्रदान समारंभाचे आभासी वातावरण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दीक्षांत सोहळा प्राध्यापकांच्या मेहनतीच्या माध्यमातून ऑनलाईन पार पडला.

पदवीदान समारंभासाठी आयआयटीचा परिसर आणि पदवीप्रदान समारंभाचे आभासी वातावरण
SHARES

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि आभासी वास्तवच्या (व्हर्च्युअल रिऍलिटी) माध्यमातून आयआयटी बॉम्बेचा ५८ वा दीक्षांत सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दीक्षांत सोहळा प्राध्यापकांच्या मेहनतीच्या माध्यमातून ऑनलाईन पार पडला. पदवीदान समारंभासाठी आयआयटीचा परिसर आणि पदवीप्रदान समारंभाचे आभासी वातावरण तयार करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांचे गप्पांचं ठिकाण, प्रयोगशाळा, वसतिगृहे अशी ठिकाणेही होतीच. शनिवार संध्याकाळपासूनच विद्यार्थ्यांनी या आभासी कट्ट्यांवर हजेरी लावली. नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक डंकन हॅल्डेन आणि स्टिफन शेवार्झमन हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे आणि सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

या समारंभात २४०४ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर, सामायिक पदवी, व्यवस्थापन पदव्युत्तर आणि पीएच.डी अशी विविध प्रमाणपत्रे देण्यात आली. यंदा १५१ विद्यार्थ्यांना पीएच.डी देण्यात आली. साहिल शहा या विद्यार्थ्यांने यंदाचे राष्ट्रपती पदक पटकावले. सह्याद्री, डिश टीव्ही यासोबत युट्युब आणि फेसबुकवर हा दीक्षांत सोहळा प्रसारित करण्यात आला.



हेही वाचा -

तब्बल ८८ वर्षानंतर मुंबई पोलिस दिसले घोड्यावर

सुशांत आत्महत्या प्रकरणात शवविच्छेदन करणाऱ्या डाॅक्टरांनी केला मोठा खुलासा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा