तब्बल ८८ वर्षानंतर मुंबई पोलिस दिसले घोड्यावर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर पहिल्यांदाच मुंबईच्या चौपाट्यांवर मुंबई पोलिस घोड्यावरून गस्त घालताना दिसत असून चौपाटीवर येणाऱ्या भाविकांचे ते आकर्षण ठरत आहेत.

तब्बल ८८ वर्षानंतर मुंबई  पोलिस दिसले घोड्यावर
SHARES

मुंबईच्या चौपाट्यांवर तब्बल ८८ वर्षानंतर मुंबई पोलिस घोड्यावरून घटनास्थळाची पाहणी करताना दिसले. १९३२ मध्ये पोलिस घोड्यावरून शहराची पाहणी करायचे. मात्र त्यावेळी वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे हे पेट्रोलिंग बंद करण्यात आले. मात्र गर्दीच्या ठिकाणी सणा सुदीला गर्दीत पोलिसांना पेट्रोलिंग करता येत नाही. त्यामुळेच ८८ वर्षानंतर मुंबई पोलिस दलात हे ३० घोडे सेवेत रूजू करून घेतले होते.  सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर पहिल्यांदाच मुंबईच्या चौपाट्यांवर मुंबई पोलिस घोड्यावरून गस्त घालताना दिसत असून चौपाटीवर येणाऱ्या भाविकांचे ते आकर्षण ठरत आहेत.


आक्रमक जमाव पांगविणे, गर्दीवर गर्दीमधूनच बारीक लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी पोलिस दलात १४ घोडे सेवेत दाखल केले. आपत्कालीन स्थितीमध्ये तसेच एखाद्या कार्यक्रमामध्ये जमलेल्या गर्दीवर वरून नजर ठेवणे सोयीचे जाते. भारतामधील चेन्नई, म्हैसूर, कोलकाता पोलिस अशावेळी घोड्यांचा वापर करतात. मॉस्को, न्यूयॉर्कसह अनेक शहरांचे पोलिसही अश्वांचा वापर करतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्र पोलिसांनी देखील ३० घोडे खरेदी करण्याचा प्रस्ताव  दिला होता. यासाठी सशस्त्र पोलिस विभागातील पोलिस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले  गेले. घोड्यांची देखभाल करण्याचे कंत्राट एखाद्या संस्थेला देण्यात आले असून अश्व खरेदी आणि इतर सर्व प्रक्रियेसाठी अंदाजे एक कोटी ७५ लाख इतका खर्च आला असल्याचे सांगितले जाते. या घोड्यांचा तबेला २.५ एकरात मरोळ येथे बांधण्यात आला आहे.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे ९९१ नवे रुग्ण, ३४ जणांचा दिवसभरात मृत्यू

२६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिल्यांदा हे युनिट सहभागी झाले. त्यानंतर पहिल्यांदाच म्हणजे गणेशोत्सवात मुंबईच्या चौपाट्यांवर मुंबई पोलिस घोड्यावरून गस्त घालताना दिसत असल्याने येथे येणाऱ्या भाविकांचे ते आकर्षण ठरत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा