Advertisement

जी/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू

दक्षिण मुंबईच्या वरळी परिसरातील जलवाहिनीला गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गळती लागली.

जी/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू
SHARES

दक्षिण मुंबईच्या वरळी परिसरातील जलवाहिनीला गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गळती लागली. वरळी नाक्याजवळील डॉ. ई. मोझेस मार्गावर वरळी टेकडी जलाशयाची ५७ इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला वरळी स्मशानभूमीसमोर शनिवारी गळती लागली होती. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनतेची पाणीपुरवठाबाबत कोणतीही अडचण होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या या पथकाने युद्धपातळीवर हे काम पूर्ण केलं.

महापालिकेच्या जल अभियंता विभागाच्या अभियंता, कर्मचाऱ्यांनी अहोरात्र राबून अवघ्या काही तासात ही जलवाहिनी दुरुस्त केली. आणि पाणीपुरवठा अखंडित ठेवण्याची स्तुत्य कामगिरी बजावली. वरळी तसंच आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या या मुख्य जलवाहिनीतून गळती होत असल्याचा संदेश मिळाल्यानंतर जल अभियंता विभागातील दुरुस्ती विभागाचे अभियंता यांनी त्वरित दुरुस्तीची कामे हाती घेतली.

शनिवारी दुपारपासून सुरू केलेलं काम अहोरात्र जागून रविवारी सकाळी १० वाजता पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे यादरम्यान कुठलाही विभागाचा पाणीपुरवठा खंडित न करता दुरुस्तीची कामे काही तासात पूर्ण करण्यात आली. वरळी विभागातील डॉ. ई .मोझेस मार्ग, बीडीडी चाळ, नारायण पुजारी मार्ग, सर पोचखानवाला मार्ग, वरळी दूध डेअरी मार्ग  या परिसरासह  लगतचा पाणीपुरवठा खंडित न करता हे काम पूर्ण करण्यात आले असून, जी/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. 



हेही वाचा -

मुंबईच्या तलावांत ९३.७४% जलसाठा; पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याची शक्यता

पदवीदान समारंभासाठी आयआयटीचा परिसर आणि पदवीप्रदान समारंभाचे आभासी वातावरण



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा