Advertisement

माथेरान पर्यटकांसाठी बुधवारपासून खुले

मागील ५ महिन्यांपासून माथेरान पर्यटन बंद होते. त्यामुळं माथेरानकरांवर उपासमारीची वेळ आली होती.

माथेरान पर्यटकांसाठी बुधवारपासून खुले
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं सर्वच व्यवसायाला फटका बसला आहे. मोठा फटका बसला असून, माथेरान येथील पर्यटन व्यवसायाची आर्थिक स्थिती बिघडली. परंतु, बुधवारपासून माथेरान पर्यटकांसाठी बुधवारपासून खुले करण्यात आलं आहे. त्यामुळं माथेरानकरांवरील आर्थिक संकट मिटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मिशन बिगिन अगेनच्या ३१ ऑगस्टच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी रायगड, अलिबाग यांच्या आदेशाप्रमाणं बुधवारपासुन पर्यटकांसाठी माथेरानकर सज्ज झाले आहेत. मागील ५ महिन्यांपासून माथेरान पर्यटन बंद होते. त्यामुळं माथेरानकरांवर उपासमारीची वेळ आली होती.

कोरोनानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यानं दुकानांचं शटर डाऊन करण्यात आलं होतं. चपला दुकानातच पडून होत्या. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळं त्यांच्यावर बुरशी चढली असून, त्या खराब झाल्या. त्यामुळं सुमारे २ लाखांचं नुकसान झालं. मात्र, आता पर्यंटकांसाठी माथेरान खुलं झाल्यानं आर्थिक संकट दुर होणार आहे.

७०० हेक्‍टरवर वसलेले माथेरान हे टुमदार पर्यटनस्थळ आहे. मुंबई-पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्यानं या ठिकाणी पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. त्यामुळं स्थानिकांचाच नव्हे तर कर्जत तालुक्‍यातील गावांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटलेला आहे.



हेही वाचा - 

श्रीमंत लोकं दबाव टाकून आयसीयू बेड अडवतात- राजेश टोपे

IPL 2020 : 'अशी' आहे मुंबई इंडियन्सची नवी जर्सी, नक्की बघा, तुम्हालाही आवडेल...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा