Advertisement

IPL 2020 : 'अशी' आहे मुंबई इंडियन्सची नवी जर्सी, नक्की बघा, तुम्हालाही आवडेल...

आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सनं रविवारी नव्या जर्सीचं अनावरन केलं आहे.

IPL 2020 : 'अशी' आहे मुंबई इंडियन्सची नवी जर्सी, नक्की बघा, तुम्हालाही आवडेल...
SHARES

यंदा आयपीएलचा १३ वा हंगामा युएईमध्ये होणार आहे. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेची सुरुवात होणार असून, अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. तसंच, आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सनं रविवारी नव्या जर्सीचं अनावरन केलं आहे. यंदा सॅमसंग हे मुंबई इंडियन्सचं टायटल स्पॉन्सर आहेत.

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सनं दिमाखात जेतेपद पटकावलं. महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा पराभव करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं चौथ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावलं. यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती इथं होणार असून मुंबई इंडियन्सलाच प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मुंबई इंडियन्सनं २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९मध्ये जेतेपद पटकावलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) युएईमध्ये खेळविण्यात येणार आहे. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा प्रथम सामना मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंह धोनीची चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगण्याचे संकेत मिळत होते. परंतू चेन्नईच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं मुंबई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना रंगण्याचे संकेत मिळत आहेत.हेही वाचा -

IPL 2020 : खेळाडूंसंदर्भात युएईच्या क्रिकेट बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय

IPLचा सलामीचा सामना MI वि. RCB यांच्यात होण्याची शक्यता


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा