Advertisement

IPLचा सलामीचा सामना MI वि. RCB यांच्यात होण्याची शक्यता

चेन्नईच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं मुंबई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना रंगण्याचे संकेत मिळत आहेत.

IPLचा सलामीचा सामना MI वि. RCB यांच्यात होण्याची शक्यता
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) युएईमध्ये खेळविण्यात येणार आहे. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा प्रथम सामना मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंह धोनीची चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगण्याचे संकेत मिळत होते. परंतू चेन्नईच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं मुंबई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना रंगण्याचे संकेत मिळत आहेत.

चेन्नई सुपरकिंग्ज संघातील दोन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील १२ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयसमोर पुन्हा एकदा मोठं संकट निर्माण झालं आहे. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे, तरीही अद्याप स्पर्धेच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सलामीच्या सामन्यात कदाचीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला संधी मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धेचा पहिला सामना असल्यामुळं स्टार खेळाडू मैदानावर उतरवणं गरजेचं आहे. त्यामुळं चेन्नई खेळू शकणार नसेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संधी देण्याची चर्चा सध्या होत असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाची लागण झालेल्या चेन्नईच्या दोन्ही खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईच्या इतर खेळाडूंचाही क्वारंटाइन कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळं आगामी काळात गव्हर्निंग काऊन्सिल वेळापत्रकाची घोषणा कधी करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

अंधेरीतील खड्ड्यांना तलावांची नावं, फोटो होतोय व्हायरल

JEE च्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष गाड्या


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा