Advertisement

अंधेरीतील खड्ड्यांना तलावांची नावं, फोटो होतोय व्हायरल

एकाच ठिकाणी अधिक खड्डे पडल्यानं ते धोकादायक ठरत आहेत.

अंधेरीतील खड्ड्यांना तलावांची नावं, फोटो होतोय व्हायरल
SHARES

मुंबईत ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसानं तुफान बॅटींग केली. या पावसामुळं मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्डयांचा आकार छोटा असला तरी एकाच ठिकाणी अधिक खड्डे पडल्यानं ते धोकादायक ठरत आहेत. अशाच एका रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो काढून त्याला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची नाव देण्यात आली आहेत. याबाबचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईच्या अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी रोड नं-११ या रस्त्यावर ठिक-ठिकाणी खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी ७ हून अधिक खड्डे पडले आहेत. त्यामुळं या खड्ड्यांना तुलसी, विहार, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, ही नावं देण्यात आली आहेत. तसंच, मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव ९६ टक्के भरल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे.

ट्विटरच्या माध्यमातून महापालिकेला याबाबत कळविण्यात आलं असून, यावर महापालिकेनं खड्डे लवकरच बुजविण्यात येतील असं म्हटलं. दरम्यान, या खड्ड्यांबाबत महापालिकेकडं अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु, महापालिका यावर दुर्लक्ष करत असल्याचं समजतं. त्यामुळं नागरिकांची गैरसोय होत असून, आपला जीव धोक्यात घालून त्यांना प्रवास करावा लागत आहे. 



हेही वाचा -

JEE च्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

‘मुंबईचा राजा’चं कृत्रिम तलावात विसर्जन


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा