Advertisement

‘मुंबईचा राजा’चं कृत्रिम तलावात विसर्जन

‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती मिरवणाऱ्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली' तील गणरायाचं कृत्रिम तलावात विसर्जन करून जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.

‘मुंबईचा राजा’चं कृत्रिम तलावात विसर्जन
SHARES

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… एक, दोन, तीन, चार, गणपतीचा जयजयकार अशा जयघोषांसह अनंतचतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यात येत आहे. १० दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर ‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती मिरवणाऱ्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली' तील गणरायाचं कृत्रिम तलावात विसर्जन करून जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. (mumbai cha raja immersion in artificial pond)

राजाच्या विसर्जनासाठी फुलांनी सजवलेला कृत्रित तलाव उभारण्यात आला होता. सायंकाळी विधीवत पूजा झाल्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत या तलावात राजाचं विसर्जन करण्यात आलं. यंदा कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता विभागीय नागरिकांना घरगुती गणपती  विभागात विसर्जन करता यावे याकरिता 'मुंबईचा राजा' च्या वतीने गणेश मैदान, गणेशगल्ली इथं कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती.

कोरोनाच्या संकटामुळं यावर्षी बाप्पाचं आगमन जेवढं साधेपणाने झालं, तेवढ्याचं साधेपणाने बाप्पाला निरोप देखील देण्यात आला. आगमनासोबतच विसर्जन सोहळ्यातील गर्दी टाळण्यासाठी मिरवणुकांवर बंदी घालण्यात आल्याने ठिकठिकाणी अत्यंत शांततेत बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. त्यामुळेच दरवर्षी बँडबाजा, ढोलताशांच्या गजरात मोठ्या दिमाखात आपल्या महालातून निघणाऱ्या मुंबईच्या राजाचंही अत्यंत साधेपणाने कृत्रित तलावात विसर्जन करण्यात आलं. 

कोरोनामुळं बाप्पाचे विसर्जन समुद्रात न करता कृत्रिम तलावात व्हावं, यासाठी मुंबई महापालिकेनं पुढाकार घेतला होता. त्याला चांगला प्रतिसाद भाविकांनी दिला. 

यंदा कोरोनामुळं व सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या आवाहनानुसार, मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यावर्षी शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय वर्गणीदारांकडून वर्गणी न घेता मुख्यमंत्री सहायता निधीत ५ लाखांची मदत देखील केली. शिवाय गणेशोत्सवाच्या काळात विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा