Advertisement

IPL 2020 : खेळाडूंसंदर्भात युएईच्या क्रिकेट बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय

यंदा जगप्रसिद्ध असलेल्या इंडियन प्रीमियर लीचा (आयपीएल) १३ वा हंगामा युएईमध्ये होणार आहे.

IPL 2020 : खेळाडूंसंदर्भात युएईच्या क्रिकेट बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय
SHARES

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यानुसार, आयपीएलच्या खेळाडूंनाह क्वारंटाइन करणार का असा सवाल उपस्थित झाला होता. परंतु, आता या प्रश्नाला एमिरेट्स क्रिकेट बोर्डानं पुर्णविराम दिला असून, खेळाडूंना प्रत्येक वेळी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर क्वारंटाइन न करता थेट खेळाच्या ठिकाणी ते हॉटेलमध्ये येणं-जाणं करता येणार आहे.

'दुबई, अबु धाबी आणि शारजा अशा ३ ठिकाणी आयपीएलचे सामने आयोजित करण्यासाठी आवश्यक त्या परवानगी मिळविण्यात आल्या आहेत. या स्टेडियमशी संबंधित असलेले स्थानिक प्रशासन या संबंधीचे नियम आणि प्रोटोकॉल तयार करणार आहे. त्यामुळं खेळाडूंना प्रत्येक वेळी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर क्वारंटाइन न करता थेट खेळाच्या ठिकाणी ते हॉटेलमध्ये येणे-जाणे सुकर होणार आहे', अशी माहिती एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने दिली.

'या सर्व प्रवासांदरम्यान सर्व संघ हे बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार जैव-सुरक्षित बबलमध्ये राहतील. परदेशातून किंवा जैव-सुरक्षित बबलच्या बाहेरून येणाऱ्यांना स्पर्धेसाठी दाखल झाल्यावर क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. पण जे बबलमध्ये आहेत त्यांना सामन्यांसाठी प्रवास करताना चिंता करण्याची गरज नाही. त्यांना सारखं-सारखं क्वारंटाइन केलं जाणार नसल्याचंही बोर्डानं स्पष्ट केलं आहे.

यंदा जगप्रसिद्ध असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १३ वा हंगामा युएईमध्ये होणार आहे. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेची सुरुवात होणार असून, अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्याशिवाय, ड्रीम ११ला यंदाचं टायटल स्पॉन्सर्स जाहीर करण्यात आले. २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली.



हेही वाचा -

IPLचा सलामीचा सामना MI वि. RCB यांच्यात होण्याची शक्यता

IPL साठी धक्कादायक बातमी! १२ सपोर्ट स्टाफसह CSK चे खेळाडू कोरोनाग्रस्त


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा