Advertisement

IPL साठी धक्कादायक बातमी! १२ सपोर्ट स्टाफसह CSK चे खेळाडू कोरोनाग्रस्त

युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील एका गोलंदाजसह सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

IPL साठी धक्कादायक बातमी! १२ सपोर्ट स्टाफसह CSK चे खेळाडू कोरोनाग्रस्त
Represenative image of the team
SHARES

इंडियन प्रीमियर लिग (IPL)चा १३ वा हंगाम सुरू होण्याआधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI)ला मोठा धक्का बसला आहे. युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील एका गोलंदाजसह सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

भारतातील कोरोनाच्या संकटामुळे बीसीसीआयने ही यंदाचा आयपीएलचा सीझन युएईत आयोजित करण्याचं ठरवलं आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्ज संघ सर्वात पहिल्यांदा युएईत दाखल झाला होता. दुबईत दाखल झाल्यापासून क्वारंटाईन राहण्याचा ६ दिवसांचा कालावधीत या सर्व सदस्यांनी २१ आॅगस्ट रोजीच पूर्ण केलेला आहे. नियमानुसार दुबईत दाखल झाल्याबरोबरच सर्वांची कोरोनाची चाचणी घेतली असता, या चाचणीत १३ जणांचे चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप पाॅझिटिव्ह आलेल्या सदस्यांचे नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. कोरोनाची लागण झालेल्या चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात हलवलं आहे. 

हेही वाचा- धोनीनं मारलेला षटकार जिथे पडला, ते आसन राखीव ठेवण्याची एमसीएकडे विश्वस्तांची मागणी

बीसीसीआयने युएईत दाखल झाल्यानंतर सर्व संघांना मार्गदर्शक तत्व आखून दिली होती. त्यानुसार चेन्नई सुपर किंग्जचा संघ या सर्व नियमांचं पालन करत होता. संघातील सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चेन्नईच्या खेळाडूंनी अजून सरावाला सुरुवात केलेली नाही. तसंच चेन्नईच्या संघाने क्वारंटाईनचा कालावधी देखील आठवडाभरासाठी वाढवला आहे. दरम्यान, स्पर्धा सुरू होण्यास २२ दिवस उरले आहेत. राजस्थान, पंजाब यासारख्या संघांनी आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. परंतु चेन्नईच्या व्यवस्थापनाची डोकेदुखील या प्रकारामुळे वाढली आहे. चेन्नईचा संघ सामना सुरू होण्याआधी सरावाला सुरूवात करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने अद्याप आयपीएलच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही.

आयपीएलच्या निमित्ताने भारतातून युएईत ८ संघातील खेळाडू आणि इतर स्टाफ मिळून १ हजारापेक्षा जास्त सदस्य आले आहेत. कोणत्याही संघासोबत हा प्रकार घडणं अत्यंत स्वभाविक आहे. सर्व खबरदारी घेतल्यानंतरही चेन्नईतील खेळाडू व इतर सदस्यांना अहवाल पॉझिटीव्ह येणं हे दुर्दैवी आहे. परंतू परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही यासाठी सर्वतोपरीने काळती घेतली जात असल्याची माहिती आयपीएलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा