Advertisement

IPL च्या १३ व्या हंगामासाठी नवा प्रायोजक मिळाला

आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी ड्रीम ११ या कंपनीची बोली अंतिम ठरवण्यात आली असून ड्रीम ११ आयपीएल २०२० च्या हंगामाची मुख्य प्रायोजक असेल, अशी माहिती आयपीएलचे चेअरमन ब्रृजेश पटेल यांनी दिली.

IPL च्या १३ व्या हंगामासाठी नवा प्रायोजक मिळाला
SHARES

आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी ड्रीम ११ या कंपनीची बोली अंतिम ठरवण्यात आली असून ड्रीम ११ आयपीएल २०२० च्या हंगामाची मुख्य प्रायोजक असेल, अशी माहिती आयपीएलचे चेअरमन ब्रृजेश पटेल यांनी दिली. विवो सोबतच्या कराराला वर्षभरासाठी स्थगिती दिल्यानंतर बीसीसीआयने नव्या प्रायोजकाचा शोध सुरू केला होता. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बीसीसीआय आणि ड्रीम ११ यांच्यात करार असणार आहे. (dream11 wins ipl title sponsorship says bcci ipl chairman brijesh patel)

तेराव्या हंगामासाठी स्पॉन्सरशिपसाठी निविदा मागवताना बीसीसीआयने काही अटी घातल्या होत्या. वार्षिक उलाढाल ३०० कोटींपेक्षा जास्त असलेल्या कंपनीनालाच बोली लावता येणार होती. स्पॉन्सरशिपचे हक्क देताना सर्वात जास्त बोली लावणाऱ्या कंपनीला हक्क देणार नाहीत हे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं होतं. हक्क मिळणाऱ्या कंपनीचा आयपीएल या ब्रँडला कसा फायदा होईल, याचा विचार करुनच नवीन स्पॉन्सरची निवड करण्यात येईल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा - VIVO सोबतचा करार मोडला, बीसीसीआयने केली घोषणा

त्यानुसार आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपसाठी ड्रीम ११, टाटा सन्स, पतंजली, बायजूस, अनाकॅडमी या कंपनी शर्यतीत होत्या.  काही दिवसांपूर्वी टाटा सन्सचं नाव या शर्यतीत आघाडीवर होतं. यापैकी अनाकॅडमी २१० कोटी, टाटा सन्स १८० कोटी तर बायजूसने १२५ कोटींची निविदा भरली होती. पण अंतिम क्षणी ड्रीम ११ ने २२२ कोटींची बोली लावल तेराव्या हंगामाच्या स्पॉन्सरशिपचे हक्क मिळवले. 

बीसीसीआय आणि व्हिवो कंपनीमध्ये आयपीएलच्या स्पाॅन्सरशिपसाठी २०१८ मध्ये ५ वर्षांचा करार करण्यात आला होता. या करारानुसार प्रत्येक वर्षाला ४४० कोटी रुपये यानुसार २१९९ कोटी रुपये व्हिवो ने बीसीसीआयला दिले होते.

कोरोना संकटामुळे यावर्षीची आयपीएल होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं असतानाच गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये मोठा संघर्ष झाला. या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशात चीन विरोधातील संताप उफाळून आला. चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, चिनी कंपन्यांसोबत केलेले करार मोडून टाका, अशी जोरदार मागणी होत होती. त्यानंतर बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लिग (IPL)च्या १३ व्या हंगामाकरीता VIVO या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा टायटल स्पाॅन्सरशिपचा करार वर्षभरासाठी स्थगित केला.

हेही वाचा - IPL 2020 : आयपीएलसाठी रोहित शर्माचा जोरदार सराव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा