Advertisement

IPL 2020 : आयपीएलसाठी रोहित शर्माचा जोरदार सराव

१९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.

IPL 2020 : आयपीएलसाठी रोहित शर्माचा जोरदार सराव
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा स्थगित झालेली इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) सप्टेंबर महिन्यात होणार आहे. यंदाच्या आयपीएल 2020ची अधिकृत घोषणा २ ऑगस्टला करण्यात आली. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केली. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. 

आयपीएल २०२० ला केंद्र सरकारनं परवानगी दिल्यानं सर्व खेळाडू हळूहळू आयपीएलसाठी तयारी करू लागले आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार-फलंदाज रोहित शर्मादेखील आयपीएलसाठी सज्ज होत आहे. आयपीएल सामन्यांसाठी लागणारा फिटनेस कमावणं ही महत्त्वाची बाब आहे. तसेच बराच काळ क्रिकेटपासून सारेच लांब असल्याने खेळताना दुखापती टाळणे हे देखील एक महत्त्वाचे आव्हान असणार आहे. 

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळं या वर्षी मार्चपासून सर्व क्रिकेट स्पर्धा सक्तीने स्थगित करण्यात आल्या होत्या. अनेक महिने न खेळल्यामुळं बहुतेक खेळाडूंसाठी ही स्पर्धा आव्हानात्मक असणार आहे.



हेही वाचा -

‘त्या’ वक्तव्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आपण कुणाबद्दल बोलतोय, याचं तरी भान ठेवा, अजित पवारांनी पडळकरांना सुनावलं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा