‘त्या’ वक्तव्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘त्या’ वक्तव्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

प्रसिद्धी मिळवण्यासाठी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्याकडे यासंबंधी निवेदन दिलं. शरद पवार यांनी गेल्या ५५ वर्षांपासून देशाच्या व राज्याच्या राजकारणात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, साहित्यिक, आरोग्य विषयक, कृषी, सहकार, पशुसंवर्धन,औद्योगिक क्षेत्रांतील प्रश्न सोडविण्याचं व आपत्कालीन परिस्थितीत मार्ग काढण्याचे काम केलं आहे. अशा नेतृत्वावर प्रसिध्दी मिळवण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. त्यामुळे पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी,अशी मागणी याद्वारे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या निवेदनातंर पडळकर यांच्यावर भा.द.वि.क ५०५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा - शरद पवार महाराष्ट्राला लागलेले कोरोना, गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

काय केली टीका?

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण करत आहेत. पण या काळात त्यांनी बहुजन समाजाला झुलवत ठेवून केवळ राजकारण केलं. बहुजन समाजाला कधीही पुढं येऊ दिलं नाही. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. त्यामुळे पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह असतील असं वाटत नाही. खरं तर पवार यांची कुठलीही विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही, अशी टीका पडळकरांनी शरद पवारांवर केली होती.

शत्रू नाहीत

त्यावर, शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत, पण शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे. मी या संदर्भात पडळकरांशी फोनवरून चर्चा केली. तेव्हा भावनेच्या भरात आपण हे विधान केल्याचं पडळकरांनी मान्य केलं आहे. याबाबत ते स्वत:च लवकर खुलासा करतील. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत, असं माझं मत आहे, असं म्हणत पडळकर यांचे कान टोचले होते.

हेही वाचा - शरद पवार आमचे राजकीय विरोधक; शत्रू नाहीत- देवेंद्र फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा