Advertisement

VIVO सोबतचा करार मोडला, बीसीसीआयने केली घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI)ने अखेर इंडियन प्रीमियर लिग (IPL)च्या १३ व्या हंगामाकरीता VIVO या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा टायटल स्पाॅन्सरशिपचा करार वर्षभरासाठी स्थगित केला आहे.

VIVO सोबतचा करार मोडला, बीसीसीआयने केली घोषणा
SHARES

भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI)ने अखेर इंडियन प्रीमियर लिग (IPL)च्या १३ व्या हंगामाकरीता VIVO या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा टायटल स्पाॅन्सरशिपचा करार वर्षभरासाठी स्थगित केला आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने परिपत्रक जाहीर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. येत्या १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात यूएईमध्ये यंदाची आयपीएल स्पर्धा रंगणार आहे. (bcci cancels contract with vivo for 13th season of ipl)

बीसीसीआय आणि व्हिवो कंपनीमध्ये आयपीएलच्या स्पाॅन्सरशिपसाठी २०१८ मध्ये ५ वर्षांचा करार करण्यात आला होता. या करारानुसार प्रत्येक वर्षाला ४४० कोटी रुपये यानुसार २१९९ कोटी रुपये व्हिवो ने बीसीसीआयला दिले होते. 

कोरोना संकटामुळे यावर्षीची आयपीएल होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं असतानाच गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये मोठा संघर्ष झाला. या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशात चीन विरोधातील संताप उफाळून आला. चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, चिनी कंपन्यांसोबत केलेले करार मोडून टाका, अशी जोरदार मागणी होऊ लागली.   

हेही वाचा - यपीएलच्या तारखांची घोषणा, 'या' तारखेला होणार पहिला सामना

त्यानुसार बीसीसीआयने देखील व्हिवो कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी दबाव वाढत होता. असं असूनही बीसीसीआयच्या गव्हर्निंग काऊन्सिलने आयपीएलच्या १३ व्या सीझनसाठी कंपनीची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरीही देशभरातील चाहते आणि इतर संलग्न जाहिरातदारांची नाराजी दूर न झाल्याने बीसीसीआयने एक पाऊल मागे येत वर्षभरासाठी व्हिवो सोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.  

बीसीसीआयच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत व्हिवो कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत केवळ चालू वर्षासाठी करार स्थगित करण्यात आला आहे. या एका वर्षाच्या मोबदल्यात व्हिवो कंपनीसोबतचा करार २०२३ पर्यंत वाढवता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करणार असल्याचंही कळत आहे. शिवाय बीसीसीआयला या वर्षासाठी नवीन स्पाॅन्सर शोधण्याचीही मेहनत करावी लागणार आहे.

हेही वाचा - आयपीएलसाठी आणखी एक महत्वाची मालिका रद्द होण्याची शक्यता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा