Advertisement

आयपीएलसाठी आणखी एक महत्वाची मालिका रद्द होण्याची शक्यता


आयपीएलसाठी आणखी एक महत्वाची मालिका रद्द होण्याची शक्यता
SHARES

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाचा फटका क्रिकेटविश्वालाही बसला आहे. यंदा मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं इंडियन प्रिमियर लीग(आयपीएल) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं यंदा आयपीएल होणार का नाही... या वरुन क्रिकेटप्रेमींमध्ये चांगलीच चर्चा रंगली. त्याशिवाय, आयपीएल खेळविण्यासाठी अनेक पर्यायही समोर आले. मात्र, आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआने आता चांगलीच कंबर कसलेली दिसत आहे. आयपीएलसाठी एक महत्वाची मालिका रद्द करण्याच्या विचारात बीसीसीआय आहे.

याआधी आशिया चषक रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता एक महत्वाची मालिका रद्द करण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. पण प्रतिस्पर्धी संघाच्या क्रिकेट मंडळाने भारताबरोबरची मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. आयपीएल झाले नाही तर बीसीसीआयला ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळं या वर्षी कोणत्याही परिस्थितीत आयपीएल खेळवण्यासाी बीसीसीआय प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळते आहे.

आयपीएलसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आशिया चषक स्पर्धाही रद्द केली. त्यामुळं आता एक महत्वाचा दौराही आयपीएलसाठी रद्द होण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारताच्या दौऱ्यावर इंग्लंडचा संघ सप्टेंबर महिन्यामध्ये येणार होता. पण या महिन्यात बीसीसीआय आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे हा भारताचा दौर रद्द करण्याचा निर्णय इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने घेतल्याचं समजतं. हेही वाचा -

Jio 5G: पुढच्या वर्षी येणार जिओचं ५ जी नेटवर्क- मुकेश अंबानी

‘या’ परिसरात साचलं पाणी, पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ते केले बंदसंबंधित विषय
Advertisement