Advertisement

धोनीनं मारलेला षटकार जिथे पडला, ते आसन राखीव ठेवण्याची एमसीएकडे विश्वस्तांची मागणी


धोनीनं मारलेला षटकार जिथे पडला, ते आसन राखीव ठेवण्याची एमसीएकडे विश्वस्तांची मागणी
SHARES

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीच्या निवृत्तीनंतर त्याच्या क्रिकेचविश्वातील आठवणींना उजाळा देण्यासाठी त्याच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये कायमस्वरुपी आसन राखीव ठेवण्याची मागणी झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विश्वस्त अजिंक्य नाईक यांनी ही मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई असोसिएशनला त्याबाबत पत्रही लिहिलं आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी त्यांचा सन्मान म्हणून त्याच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये कायमस्वरुपी आसन राखीव ठेवण्याची मागणी झाली आहे. अजिंक्य नाईक यांच्या मागणीवर एमसीएच्या आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. नाईक यांनी महेंद्रसिंह धोनीच्या ऐतिहासिक क्रिकेट कामगिरीचा सन्मान म्हणून आणि अभिवादन करण्यासाठी एमसीएला अनेक सूचना केल्या आहेत. 

यामध्ये त्यांनी तसंच, त्या आसनाचं खास सुशोभीकरण करण्याची सूचना केली आहे. भारतीय क्रिकेट विश्वाला महेंद्रसिंह धोनीने दिलेल्या योगदानासाठी त्याचा सन्मान म्हणून आणि त्याला अभिवादन करण्यासाठी काही सूचना करण्यात येत असून, 'विश्वचषक २०११च्या अंतिम सामन्यात शेवटच्या क्षणी धोनीनं मारलेला षटकार प्रेक्षक गॅलरीत ज्या आसनावर जाऊन पडला ते आसन राखीव ठेवावा', असं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विश्वस्त अजिंक्य नाईक यांनी म्हटलं.



हेही वाचा -

नवी मुंबईत गणेश विसर्जनासाठी १३० कृत्रिम तलाव

मुंबईला पाणीपुरवठा करणारं 'हे' तलावही ओव्हरफ्लो



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा