Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

महेंद्र सिंग धाेनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती


महेंद्र सिंग धाेनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
SHARES

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अखेर शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंस्टाग्रामवरून धोनीने ही माहिती दिली. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून धोनी पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना होती. परंतु धोनीने आपल्या चाहत्यांना अचानक धक्का दिला आहे. (former indian captain mahendra singh dhoni announced retirement from international cricket)

आयपीएलचे स्थगित झाल्यामुळे धोनीच्या चाहत्यांची काळजी वाढली होती. पण युएईमध्ये होणारी आयपीएल खेळण्यासाठी धोनी रांचीहून चेन्नईला दाखल झाला होता. इंग्लंडमध्ये झालेल्या वन-डे वर्ल्डकपनंतर तो मैदानात उतरलेलाच नाही. त्यामुळे गेल्या एक वर्षाहून अधिक काळ भारतीय क्रिकेट चाहते महेंद्र सिंह धोनीची मैदानात उतरण्याची वाट पाहत होते. याआधी धोनीने कसोटी क्रिकेटमधून २०१४ साली निवृत्ती घेतली होती.

महेंद्रसिंह धोनीने २०११ आणि २०१५मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केलं. २०११मध्ये भारतीय संघाने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. तर २०१५मध्ये भारतीय संघाला माघार घ्यावी लागली. याशिवाय २००७मध्ये पहिला टी२० वर्ल्डकपही भारताला मिळवून देण्यात भारताचं चांगलंच योगदान होतं.

धोनीनं ९० कसोटी सामन्यांत ३८.०९ च्या सरासरीनं ६ शतकं व ३३ अर्धशतकांसह ४८७६ धावा केल्या आहेत. ३५० वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ५०.५७ इतकी आहे. त्यात १०७७३ धावा करताना १० शतकं व ७३ अर्धशतकं त्याने झळकावली आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्यानं ९८ सामन्यांत १६१७ धावा केल्या आहेत. यष्टीरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर २५६ झेल व ३८ स्टम्पिंग, वन डेत ३२१ झेल व १२३ स्टम्पिंग आणि ट्वेंटी-२०त ५७ झेल व ३४ स्टम्पिंग आहेत.

आयसीसी टी २० वर्ल्डकप (२००७), आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी, आयसीसी वन डे वर्ल्डकप (२०११) आणि आयसीसी कसोटीत नंबर वन रँकींग असे अनेक विश्वविक्रम धोनीच्या कप्तानीखाली टीम इंडियाने रचले आहेत. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा