Advertisement

श्रीमंत लोकं दबाव टाकून आयसीयू बेड अडवतात- राजेश टोपे

स्वत:च्या उपचारांचा खर्च उचलण्यास सक्षम असलेले श्रीमंत लोकंही दबाव टाकून रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटा (आयसीयू बेड) अडवतात, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

श्रीमंत लोकं दबाव टाकून आयसीयू बेड अडवतात- राजेश टोपे
SHARES

स्वत:च्या उपचारांचा खर्च उचलण्यास सक्षम असलेले श्रीमंत लोकंही दबाव टाकून रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटा (आयसीयू बेड) अडवतात. यामुळेच बऱ्याचदा आयसीयू बेडची कमतरता जाणवत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (rich patients occupied icu beds of hospital says maharashtra health minister rajesh tope)

रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात आयसीयू बेड असल्याचं राज्य सरकार म्हणत असलं, तरी गरजेच्या वेळेस काही रुग्णांना हे बेड सहजपणे उपलब्ध होत नाहीत, याबद्दल प्रश्न विचारला असता, आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की,  

अनेकदा रुग्णाची स्थिती सामान्य असूनही ते आयसीयूत दाखल करण्यासाठी रुग्णालय प्रशासन आणि डाॅक्टरांवर दबाव टाकतात. असे प्रकार प्रामुख्याने लहान शहरांमध्ये सुरू आहेत. स्वत:च्या उपचारांचा खर्च उचलण्यास सक्षम असलेले श्रीमंत लोकंही दुर्दैवाने अतिदक्षता विभागातील खाटा अडवतात. परिणामी आयसीयू बेडची कमतरता निर्माण होते आणि ज्या रुग्णांना खऱ्या अर्थाने आयसीयू बेडची गरज असते, त्यांना हे बेड वेळेत मिळू शकत नाही. 

हेही वाचा - सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश

हा प्रकार अतिशय चुकीचा असून तो त्वरीत थांबला पाहिजे. आयसीयू बेड हे अतिदक्षतेची गरज असलेल्या रुग्णांनाच मिळाले पाहिजेत. कोणतीही लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना या बेडवर हलवण्यात येऊ नये. त्यासाठी रुग्णालय प्रशासनासोबतच जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना जागरुक राहावं लागेल. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनीही डाॅक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर विनाकारण दबाव टाकू नये, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं.

राज्यात खासकरून मोठ्या शहरांत कोरोना चाचण्या कमी प्रमाणात होत असल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळून लावताना राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात चाचण्यांचं प्रमाण बिलकूल कमी केलेलं नाही. किंबहुना जास्तीत जास्त चाचण्या होत असल्यानेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. परंतु त्याचसोबत प्रशासनाकडून १०० टक्के ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रेसिंग करणं हाच रामबाण उपाय आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाच्या संपर्कातील २० जणांना ट्रेसिंग करणं आम्ही बंधनकारक केलं आहे. ट्रेसिंग वाढलं की टेस्टिंग आपोआप वाढतं. टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांना क्वारंटाइन करण्यात येतं. त्यांच्यावर उपचार केले जातात, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - मालाडच्या लाइफलाइन रुग्णालयाने आकारलं २१ लाखांचं बिल, गुन्हा नोंदवण्याची भाजपची मागणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा