महाराष्ट्रात बुधवारी १८,१६६ जणांचं लसीकरण

राज्यात बुधवार २० जानेवारी २०२१ रोजी २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ (६८ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांचं कोरोना लसीकरण करण्यात आलं. सायंकाळी ७ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचं सत्र उशिरापर्यंत सुरु होतं. त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण ५१ हजार ६६० जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

राज्यात आज ३१२ जणांना कोव्हॅक्सीन लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण ८८१ जणांना ही लस देण्यात आली आहे.

सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी आणि टक्के) : अकोला (२२४, ७५ टक्के), अमरावती (५५८, ११२ टक्के), बुलढाणा (४५८, ७६ टक्के), वाशीम (२२१, ७४ टक्के), यवतमाळ (३६३, ७३ टक्के), औरंगाबाद (३१०, ३१ टक्के), हिंगोली (२१४, १०७ टक्के), जालना (२७९, ७० टक्के), परभणी (२८४, ७१ टक्के), कोल्हापूर (७७८, ७१ टक्के), रत्नागिरी (२९०, ५८ टक्के), सांगली (४३५, ४८ टक्के), सिंधुदूर्ग (१७९, ६० टक्के), बीड (३५८, ७२ टक्के), लातूर (४७३, ७९ टक्के), नांदेड (३२३, ६५ टक्के), उस्मानाबाद (२४०, ८० टक्के), मुंबई (६६६, ६१ टक्के), मुंबई उपनगर (१०६२, ८२ टक्के), भंडारा (२४१, ८० टक्के), चंद्रपूर (४३२, ७२ टक्के), गडचिरोली (१८५, ४६ टक्के), गोंदिया (२२३, ७४ टक्के), नागपूर (९२१, ७७ टक्के), वर्धा (५४३, ९१ टक्के), अहमदनगर (६८३, ५७ टक्के), धुळे (३६६, ९२ टक्के), जळगाव (५२३, ७५ टक्के), नंदूरबार (३१३, ७८ टक्के), नाशिक (९३२, ७२ टक्के), पुणे (११०९, ३८ टक्के), सातारा (८४०, ७६ टक्के), सोलापूर (८६९, ७९ टक्के), पालघर (५५८, ९० टक्के), ठाणे (१७७४, ७७ टक्के), रायगड (१३९, ३५ टक्के)

(maharashtra coronavirus vaccination update on 20th january 2021)


हेही वाचा-

मुंबईत कोरोना लसीकरण केंद्रात होणार वाढ

महाराष्ट्रात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण- राजेश टोपे


पुढील बातमी
इतर बातम्या