Advertisement

महाराष्ट्रात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण- राजेश टोपे

कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडाचा सामना करत असताना देखील महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ५४ टक्के कोरोना लसीकरण झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण- राजेश टोपे
SHARES

कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडाचा सामना करत असताना देखील महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ५४ टक्के कोरोना लसीकरण झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित जनता दरबारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना टोपे (rajesh tope) यांनी ही माहिती दिली. 

लसीकरणाबाबत अधिक माहिती देताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, कोरोना (coronavirus) लसीकरणाच्या नियोजनासाठी असलेलं कोविन अॅप अत्यंत संथगतीने चालत असल्याने काहीशी आडकाठी येत आहे. लाभार्थींची दुबार नावंही जात आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे लोकांच्या मनात थोडासा गोंधळ होणं स्वाभाविक आहे. अॅपमधील बिघाडाच्या गोष्टी केंद्र सरकारच्या वारंवार निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यानुसार अॅपमधील त्रुटी दुरुस्त करण्याचं काम केंद्रीय स्तरावर सुरू आहे. निश्चितच या त्रुटी दूर होतील, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला.

अॅपमधील बिघाडामुळे थांबून न राहता महाराष्ट्रात आॅफलाईन लसीकरणावर भर देण्यात येत आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज १०० जणांचं लसीकरण झालंच पाहिजे,  असे आदेश देण्यात आलेले आहेत. अॅप सुरळीत झाल्यास लसीकरणाला गती येईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचा- मुंबईत कोरोना लसीकरण केंद्रात होणार वाढ

महाराष्ट्रात पहिल्या दिवशी लसीकरणाचं प्रमाण ६५ टक्के होतं. तर आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण झालेलं आहे. माध्यमांनी टक्केवारीवर न जाता लसीकरण होत आहे, त्याकडे लक्ष द्यावं. लसीकरणाच्या बाबत महाराष्ट्र (maharashtra) देशात पहिल्या दोन-तीन राज्यांमध्ये आहे. आपल्याकडे सर्व प्रकारची साधनसामुग्री असून छोट्या छोट्या उणीवा दूर केल्या जात आहेत, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमधील कोरोना (covid19) लसीकरणाच्या केंद्रांत वाढ करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात ३ लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळं मुंबईकरांना आता घराजवळच कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबईसह राज्यात ४ दिवस लसीकरण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या ४ दिवशी लस दिली जाईल. मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज ४ हजार जणांना लस देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. शिवाय, टप्प्याटप्प्यानं त्यात वाढ करण्यात येणार आहे.

(54 percent coronavirus vaccination complete in maharashtra till date says rajesh tope)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा