कोरोना रुग्ण आढळण्यामध्ये महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरूवारी राज्यात तब्बल ४३,१८३ नवीन रुग्ण आढळले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त संख्या आहेत. 

धक्कादायक म्हणजे गेल्या २४ तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारीपासून तब्बल ४०० टक्के रुग्ण जास्त आढळले आहेत. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे. 

कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता 'वर्षा' बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाईल. कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध घालण्याबाबत निर्णयदेखील घेतले जाऊ शकतात. त्याचवेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन घेण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

महाराष्ट्रातील सात दिवसांतील रुग्ण

तारीख    पॉझिटिव्ह रुग्ण

२६ मार्च    ३६९०२

२७ मार्च    ३५७२६

२८ मार्च    ४०४१४

२९ मार्च    ३१६४३

३० मार्च    २७९१८

१३ मार्च    ३९५४४

१ एप्रिल    ४३१८३



हेही वाचा -

  1. मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण
  1. ठाणे जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद

पुढील बातमी
इतर बातम्या