Coronavirus Updates: मुंबईतील अनेक भागांत खासगी दवाखाने बंद

कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्यामुळं राज्य सरकारनं जिवनाश्यक वस्तूंव्यतिरीक्त इतर दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, अनेक ठिकाण खासगी दवाखानेही कोरोनाच्या भीतीनं बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, दवाखाने बंद ठेवू नका असे आवाहन केलं असतानाही दवाखाने बंद होते. 

कोरोना हा आजार बरा होऊ शकतो, असं वारंवार डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही अनेक जण संशयानं पाहत आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही नागरिकाकडे संशयाने पाहू नका. तसेच दवाखाने बंद ठेवू नका, असे आवाहन केल्यानंतरही बुधवारी मुंबईतील काही भागांमध्ये खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले होते. त्यामुळं सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.

या आपत्कालीन स्थितीत महापालिका रुग्णालयांमध्ये 'कोविड १९'ची केंद्रे तयार करण्यात आली आहे. ही वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी खासगी आरोग्यव्यवस्थेनेही मदत करावी, असं आवाहन वारंवार करण्यात येत आहे.

परळ येथील डॉ. एस. एस. राव रोडवरील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालय असून ते बंद आहे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी तयार असून, येथील ओपीडी सेवा सुरू ठेवून २०० खाटा विलगीकरणासाठी वापराव्यात, अशी विनंती कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे. 


हेही वाचा -

चिंता नको, २ रुपये किलो दराने गहू, तर ३ रुपयांना तांदूळ मिळणार!

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री 'निम्मी' यांचं निधन


पुढील बातमी
इतर बातम्या