कोरोनाच्या वैद्यकीय तपासण्या कस्तुरबा रुग्णालयात होणार

कोरोना विषाणू (corona virus) च्या संदर्भातील वैद्यकीय तपासण्या लवकरच कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) सुरू करण्यात येणार आहेत. दोन आठवड्यांत या तपासण्या सुरू होतील. याशिवाय देशातील इतर महत्त्वाच्या केंद्रांमध्येही या तपासण्या सुरू करण्यात येणार आहेत.

(corona virus) ने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे भारतामध्ये करोना विषाणूच्या वैद्यकीय निदान चाचण्यांची गुणवत्ता आणि उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांनी कस्तुरबा रुग्णालयाची गेल्या आठवड्यात पाहणी केली. चीनहून आलेल्या काही संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयामध्ये (Kasturba Hospital) 

कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital)  आत्तापर्यंत ८ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ६ जणांना घरी सोडले आहे.  राज्यात ४ ठिकाणी रुग्णालयांत विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेल्या १७ प्रवाशांपैकी १२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे येथे शनिवारी रात्री दोघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. सध्या मुंबई येथे २, तर पुणे येथे ३ जण रुग्णालयात आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरू असून आत्तापर्यंत ६४३२ इतके प्रवासी तपासण्यात आले आहेत. सर्व प्रवाशांचा त्यांच्या आरोग्यस्थितीबाबत नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे.


हेही वाचा  -

मोबाइलवरून करता येणार पाण्याच्या मीटरचं रिडींग

मंगळवारी पालिका सादर करणार अर्थसंकल्प

३ वर्षांत २५ जलवाहिन्या फुटल्या, मेट्रो कामाचा मुंबईकरांना मनस्ताप


पुढील बातमी
इतर बातम्या