Advertisement

मंगळवारी पालिका सादर करणार अर्थसंकल्प

२०१९-२० या आर्थिक वर्षात बीएमसीने ३० हजार ६९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प २८ किंवा २९ हजार कोटींच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

मंगळवारी पालिका सादर करणार अर्थसंकल्प
SHARES

मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation - बीएमसी) आयुक्त प्रवीण परदेशी (pravin pardeshi) मंगळवारी ४ फेब्रुवारीला आपल्या कालावधीतील पहिला अर्थसंकल्प (Budget) सादर करतील. बीएमसी ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात बीएमसीने ३० हजार ६९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प २८ किंवा २९ हजार कोटींच्या आसपास असण्याची शक्यता आहे. 

३१ डिसेंबर २०१९ पर्यंत बीएमसी (Mumbai Municipal Corporation) ने आपल्या बजेट (Budget) च्या ४५ टक्के म्हणजे १२ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. या अर्थसंकल्पात रस्ते व रहदारी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प,  उद्याने, पाणीपुरवठा प्रकल्प आणि इतर मेगा प्रकल्पांच्या तरतूदीत कपात होण्याची शक्यता आहे. कोस्टल रोड वगळता, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, अग्निशमन दल, गारगाई-पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्पासाठीच्या तरतुदीत घट होण्याची शक्यता आहे. २०१९-२० साली कोस्टल रोडसाठी १ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यात आणखी २०० ते ३०० कोटी रुपयांची भर पडेल.

२० जानेवारीपर्यंत पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाला मालमत्ता करापोटी २३९४.३८ कोटी रुपये वसूल करता आले.  एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत ५० टक्के रक्कमही मुंबई पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) तिजोरीत जमा होऊ शकलेली नाही.  या पार्श्वभूमीवर आगामी अर्थसंकल्पातील रकमांना कात्री लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पालिकेचे २०१५-१६ चा अर्थसंकल्प २६ हजार ४७९ कोटींचा होता. तर २०१६-१७ मध्ये अर्थसंकल्प थेट ३७ हजार ५२ कोटींवर गेला. 



हेही वाचा -

३ वर्षांत २५ जलवाहिन्या फुटल्या, मेट्रो कामाचा मुंबईकरांना मनस्ताप

आत्महत्या करण्याच्या ट्विटवर पोलिसांची समयसूचकता, तरूणाचे वाचवले प्राण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा