मुंबईसह राज्यात महिलांसाठी लवकरच फिरता दवाखाना : राजेश टोपे

मुंबईसह राज्यात महिलांसाठी लवकरच फिरता दवाखाना दिसेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरता दवाखाना सुरु करण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

महिलांना घरातून रुग्णालयात आणणं. विशेषतः गरोदर महिला आहेत, त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित सोडणं यासाठी या फिरत्या दवाखान्याची सुविधा असणार आहे. या फिरत्या दवाखान्यात टेस्टिंग, लॅब, ८१ प्रकारची औषधं, ४० प्रकारच्या टेस्ट, सोनोग्राफी आणि महिलांचे बाळंतपण केले जाऊ शकते.

ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्याला दो- दोन फिरते दवाखाने असणार आहेत. ग्रामीण भागासह मुंबईमध्ये या फिरत्या दवाखान्याची अधिक वाढ केली जाणार आहे. याचा चांगला परिणाम होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात येईल, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.


हेही वाचा

कोरोनामुक्तीचा धारावी पॅटर्न सहाव्यांदा यशस्वी

महापालिकेची दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची तयारी सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या