Advertisement

महापालिकेची दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची तयारी सुरू


महापालिकेची दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची तयारी सुरू
SHARES

कोरोना प्रतिबंधासाठी मुंबई महापालिकेने दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा सुरूच असताना पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्याची सज्जता आजमावण्यासाठी पुढील २ दिवस सराव फेरी राबवण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी अत्यावश्यक सेवेतील २ लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या सूचना राज्य आणि केंद्रीय आरोग्य विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार लसीकरणाच्या सत्रांचे नियोजन सुरू आहे. परंतु अ‍ॅपमध्ये त्यांच्या याद्या तयार होत नसल्याने गेल्या २ दिवसांपासून यातील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. याद्या तयार झाल्या की पुढील २ दिवसांत त्यांच्याही लसीकरणाची सराव फेरी घेतली जाणार असल्याची माहिती मिळते.

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील सुमारे २ लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांचेही लसीकरण सुरू केले जाणार आहे. यासाठी केंद्रामध्येही वाढ करण्यात येणार असून या आठवड्यात मुलुंड, दहिसर आणि कुर्ला भाभा रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू होणार आहे. तसेच केंद्रावरील कक्षामध्ये वाढ केली जाणार असून सेव्हन हिल्समध्ये १५ तर नेस्कोमध्ये पाच केंद्रे सुरू होणार आहे.

सध्या उपलब्ध साठ्यामधून दुसऱ्या टप्प्याचेही लसीकरण केले जाणार असून, टप्प्याटप्प्यानं पुढील साठा देण्यात येणार आहे. त्यामुळे लस दिलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दुसरी मात्रा वेगळी ठेवली जाणार नाही.

मुंबईत सध्या १२ केंद्रांवर लसीकरण सुरू असून प्रत्येक केंद्रावर सुमारे ५०० ते हजार लाभार्थ्यांचे लसीकरण सध्या केले जाते. केंद्रांची क्षमता अधिक आहे, परंतु केंद्राकडून मर्यादित कक्ष चालविण्यासाठी परवानगी दिली जात असल्याने उपलब्ध असलेले सर्व कक्ष सुरू करता येत नाहीत. अजूनही अ‍ॅपमध्ये त्रुटी असून कधीकधी ते खूप संथ गतीने चालते.



हेही वाचा -

मध्य व पश्चिम मार्गावर एका दिवसात १ लाख पासची विक्री

मुंबईच्या तापमानात पुन्हा वाढ


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा