Advertisement

मध्य व पश्चिम मार्गावर एका दिवसात १ लाख पासची विक्री


मध्य व पश्चिम मार्गावर एका दिवसात १ लाख पासची विक्री
SHARES

राज्य सरकारनं सर्वसामान्य नागरिकांना कमी गर्दीच्या वेळी लोकल प्रवासाची परवानगी दिली. वेळेचं बंधन असल्यानं अनेक प्रवाशांनी पास काढले असून, आपल्या प्रवासाचा मार्ग मोकळा करून घेतला. त्यामुळं या पास काढणाऱ्या प्रवाशांची संख्या सोमवारी एकाच दिवसात १ लाखावर गेली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर तब्बल १ लाख ६ हजार ३८३ पासची विक्री झाली. तर २६ हजार ९५० जणांच्या पासला मुदतवाढ देण्यात आली आहे. तिकिटाबरोबरच पास काढण्यासाठी प्रवाशांची मंगळवारीही धडपड सुरूच होती. परिणामी, तिकीट खिडक्यांसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सर्वसामान्य नागरिकांना सोमवारपासून सकाळी ७ च्या आधी, दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ९ नंतर लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही पर्यायी वेळ अनेकांनी स्वीकारली असून तिकिटाबरोबरच पास काढण्यासाठीही अनेकांनी रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीबाहेर रांगा लावल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात मुदत संपलेल्या पासची मुदतवाढ करून घेण्यासाठीही अनेक प्रवाशांनी धाव घेतली होती. सकाळी ७ नंतर येणाऱ्यांना मात्र पासची मुदवाढ करून दिली जात नव्हती. मंगळवारपासून लोकल प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ नंतरही स्थानकात जाऊन पास काढले.

मर्यादित प्रवास वेळेनुसारच यूटीएस मोबाइल अ‍ॅपवरही पास व तिकीट काढण्याची मुभा होती. त्यातच तांत्रिक समस्या येत असल्याने अनेक जण तिकीट खिडक्यांवरच येऊन पास काढत होते.

पास व मुदत वाढ

  • पश्चिम रेल्वेवरून सोमवारी ४५ हजार ९६८ नवीन पासची खरेदी प्रवाशांनी केली. 
  • १४ हजार ९५० पासला मुदवाढ देण्यात आली. 
  • मध्य रेल्वेवरही ६० हजार ४१५ नवीन पासची खरेदी प्रवाशांनी केली.
  • १२ हजार पासला मुदवाढ देण्यात आल्याची माहिती दिली.
  • ७९४ मोबाइल सेवेतूनही पास काढण्यात आले. 

तब्बल ८९ हजारांपेक्षा जास्त पासची विक्री झाली. तिकीट खिडक्यांवरून तिकीट व पास, मोबाइल तिकीट व पास, एटीव्हीएम तिकीट यातून मध्य रेल्वेला २ कोटींहून अधिक महसूल प्राप्त झाला. तर पश्चिम रेल्वेलाही सुमारे २ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. नवीन पास काढणाऱ्यांमध्ये अत्यावश्यक सेवा कर्मचारीही आहेत. परंतु त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.



हेही वाचा -

लोकल सेवेच्या वेळेतील बदलासाठी पाठपुरावा करू - राजेश टोपे

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीला ‘ईडी’ची नोटीस


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा