ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

मुंबईला लागून असलेल्या ठाण्या कोरोनाचं जास्त रुग्ण आढळत आहेत. रुग्णांच्या वाढत्या आकड्यामध्ये तर ठाण्यानं मुंबईला देखील मागे टाकलं आहे. पण असं असलं तरी मुंबईपेक्षा ठाण्यातच जास्त कोरोना रुग्ण बरे होत आहेत. मुंबईत बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची टक्केवारी ७७.९५ टक्के आहे. तर ठाण्यात ७९.८८ टक्के रुग्ण कोरोनामधून बरे होत आहेत. रविवारी ठाण्यात कोरोना रूग्णांची संख्या ९८ हजारांवर पोहोचली आहे.

ठाण्यामध्ये रविवारी COVID 19 चे १ हजार २०७ नवे रुग्ण आढळले. सध्या ठाण्यात कोरोनाचे रुग्ण ९८ हजार १६७ च्या घरात आहेत. तर कोरोनामुळे २९ लोकांचा जीव गेला आहे. मृतांचा एकूण आकडा २ हजार ७४७ पर्यंत गेला आहे. नव्या रुग्णांपैकी ३३२ रुग्ण हे नवी मुंबईचे आहेत. तर कल्याणमधील २९७ रुग्ण आहेत.

रविवारी सलग दुसर्‍या दिवशी भिवंडीतून कुठल्याही मृत्यूची नोंद नाही. कल्याणमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.९६ इतके घसरले आहे. मुंब्रा परिसरातील रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. शुक्रवारी मुंब्रा शहरात कोरोनाचे कोणतेही नवीन रुग्ण आढळले नाहीत.


हेही वाचा

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी १६९ नवीन रुग्ण

मालाड ते दहिसर दरम्यान घटतेय कोरोना रूग्णांची संख्या

भिवंडीत कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यात वाढ, प्रशासन चिंतेत

पुढील बातमी
इतर बातम्या