Advertisement

भिवंडीत कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यात वाढ, प्रशासन चिंतेत

भिवंडीत कोरोना रुग्ण सापडण्याची संख्या कमी होतेय. पण असं असलं तरी कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन चिंतेत आहे.

भिवंडीत कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यात वाढ, प्रशासन चिंतेत
SHARES

भिवंडीत कोरोना रुग्ण सापडण्याची संख्या कमी होतेय. पण असं असलं तरी कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन चिंतेत आहे. ८ ऑगस्टला भिवंडीमध्ये कोरोनामुळे ४० रुग्णांचा मृत्यू झाला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भिवंडीमध्ये कोरोनामुळे ६० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी सध्या कोरोना रुग्णांची संख्या १३० दिवसात दुप्पट होत आहेत.

भिवंडीत रुग्ण बरे होण्याचा दर ८६.६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर मृत्यूचा दर ६.९ टक्के आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी सलग दुसर्‍या दिवशी भिवंडीत कोणत्याही पेशंटचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. रविवारी भिवंडी शहरात २३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मृत्यूची संख्या ३ हजार ७७९ वर गेली आहे.

भिवंडीमध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा २५८ वर पोहोचला आहे. रविवारी ३० नागरिक बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ हजार २८२ झाली आहे. २३९ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



हेही वाचा

धारावी नियंत्रणात, दादर, माहीममध्ये रुग्णवाढ कायम

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ८९ दिवसांवर

९८ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा