Advertisement

९८ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

देशात कोरोनाचे सर्वाधिक बळी हे ६० वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे गेले आहेत. काही दिवसांपूर्वी एका १०० वर्ष वयाच्या आजोबा कोरोनातून बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले.

९८ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात
SHARES

देशात कोरोनाचे सर्वाधिक बळी हे ६० वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे गेले आहेत. काही दिवसांपूर्वी एका १०० वर्ष वयाचे आजोबा कोरोनातून बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. त्यापाठोपाठ आता मुंबईतील बोरिवलीमध्ये राहणाऱ्या एका ९८ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. हे आजोबा कोरोनातून पूर्णपणे बरे  होऊन आपल्या घरी परतले आहेत. 

बोरिवलीत राहणारे ९८ वर्षीय भंडारी यांना सर्दी आणि खोकला होता. त्यामुळे त्यांना २० जुलैला येथील अपेक्स रुग्णालयात भरती केलं होतं. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.  अपेक्स हॉस्पिटलमध्ये १९ दिवस राहून भंडारी आजोबांनी कोरोनावर मात केली. इच्छाशक्तीच्या जोरावर आजोबा कोरोनातून बरे होऊन आता घरी परतले आहेत. कोरोना संक्रमणाआधी भंडारी आजोबा एकदम तंदुरुस्त होते. रोज घरातल्या घरात वॉक, संतुलित आहार व वाचन असा त्यांचा नित्यक्रम होता. यापूर्वी मुंबईत १०० वर्ष वयाच्या कोरोनाची लागण झालेल्या वृद्ध व्यक्तीने कोरोनावर मात केली होती. एका महिन्यापूर्वी कल्याणमधील १०४ वर्षांच्या आजोबांनीही कोरोनावर मात केली होती.

कोरोनापासून आपण वाचू शकतो, गरज आहे फक्त  निर्धाराची व कोरोनाला न घाबरता सामोरे जाण्याची, हाच संदेश या आजोबांनी आपल्या इच्छाशक्तीतून दिला आहे अशी माहिती डॉ. जिग्नेश पटेल यांनी दिली.
हेही वाचा -

तर, मुंबईच काय जगातलं कुठलंही शहर तुंबेल, महापालिका आयुक्तांचा दावा

Mumbai Rains : पावसानं मोडला ४६ वर्षांचा रेकॉर्ड
Read this story in हिंदी
संबंधित विषय