Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी १६९ नवीन रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ( १० ऑगस्ट) १६९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी १६९ नवीन रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ( १० ऑगस्ट) १६९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मृतांमध्ये तळोजा फेज-१, पनवेल आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. १५४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील एकूण २६, कामोठ्यातील ४५, खांदा कॉलनीतील ८, खारघरमधील ३८, पनवेलमधील २८ नवीन पनवेलमधील १७, तळोजा आर‌एएफ कँप येथील २, तळोजा येथील ६ रुग्णाचा समावेश आहे.  

 आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ८२४८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ६४८८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून १९३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १५६७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा

धारावी नियंत्रणात, दादर, माहीममध्ये रुग्णवाढ कायम

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ८९ दिवसांवर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा