६ ते १२ वयोगटातील मुलांचं 'या' तारखेपासून होणार लसीकरण

(File Image)
(File Image)

भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल (DCGI) नं ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड-19 विरूद्ध लसीकरण करण्यास मंजुरी दिल्यानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) सांगितलं की, ते या वयोगटासाठी लसीकरण मोहीम २ मे पासून सुरू करण्याची शक्यता आहे.

मंगळवार, २६ एप्रिल रोजी, DCGI नं ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी Covaxin आणि Corbevax च्या आपत्कालीन वापराची परवानगी दिली.

याशिवाय, १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी ZycovD (Zydus Cadila vaccine) ला आपत्कालीन वापराची परवानगी दिली आहे, असा देखील दावा करण्यात आला आहे.

पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी, जे सार्वजनिक आरोग्याचे प्रभारी देखील आहेत, यांनी एचटीला सांगितलं की, येत्या दोन दिवसांत ६-१२ वर्षे वयोगटातील लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून तपशीलवार मार्गदर्शक सूचना प्राप्त करू. त्यानंतर, पालिकेला मोहिमेची व्यवस्था करण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील.

अधिका-यांनी असंही सांगितलं की, लसीकरण मोहीम सर्व सुविधांसह सुरू होईल आणि जर अतिरिक्त आवश्यकता असेल तरच ते अतिरिक्त सुविधा उभारतील.

शिवाय, सर्व लसीकरण केंद्रांमध्ये, मोहिमेचे निरीक्षण करण्यासाठी दररोज किमान एक बालरोगतज्ञ उपस्थित असेल. १२-१८ वयोगटातील लसीकरणासाठी सध्या महापालिकेच्या २४ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार बालरोगतज्ञ उपस्थित आहेत.

आता ६ ते १२ वयोगटातील बालकांना लस टोचण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात आणखी एक बालरोगतज्ञ नियुक्त केला जाणार आहे. अहवालानुसार, शहरातील ६-१२ वयोगटातील मुलांची जवळपास ५ लाख लोकसंख्या आहे.  


हेही वाचा

मॉल्स, सिनेमा हॉलमध्ये मास्क बंधनकारक करण्याचा टास्क फोर्सचा सल्ला

'या' वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या को-वॅक्सिनला आपत्कालीन मंजुरी

पुढील बातमी
इतर बातम्या