मेट्रोपॉलिसवर कोरोना चाचण्या करण्यास बंदी, 'हे' आहे कारण

मेट्रोपॉलिस या खासगी प्रयोगशाळेवर कोरोना चाचण्या करण्यास मुंबई महापालिकेनं बंदी आणली आहे. ही बंदी चार आठवड्यांसाठी असणार आहे. मेट्रोपॉलिसकडून कोरोना चाचणीचे अहवाल उशीरा मिळत होते. त्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली आहे.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. कोरोना चाचण्यांचे अहवाल उशिरा मिळत असल्यानं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत. तसंच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासही उशीर होतो. यामुळं रुग्णांचा मृत्यू होण्याचीही भिती आहे, असं महापालिकेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

मेट्रोपॉलिसनंही अहवाल देण्यास उशीर होत असल्याचं मान्य केलं आहे. प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्यानं मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळं अहवाल येण्यास उशीर होत असल्याचं मेट्रोपॉलिसनं म्हटलं आहे. तसंच,  चाचण्यांचे रिपोर्ट उशीरा येण्याचं प्रमाण कमी असल्याचंही मेट्रोपॉलिसनं म्हटलं आहे.


हेही वाचा -

बेस्टच्या ५४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण


पुढील बातमी
इतर बातम्या