नवी मुंबई पालिकेची फवारणी करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस

डेंग्यूच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ झाल्यानं, नवी मुंबई महानगरपालिकेनं (NMMC) फवारणीसाठी जबाबदार कंत्राटदारांना नोटीस पाठवल्या आहेत. कारण वारंवार चेतावणी देऊनही फवारणी करणारे कामगार निकृष्ट काम करत असल्याचं आढळून आलं आहे.

“काही वेळा, आम्ही कंत्राटदारांना आणि त्यांच्या कामगारांना योग्य प्रकारे फवारणी न केल्याबद्दल चेतावणी दिली आहे. परंतु, वारंवार चेतावणी देऊनही त्यांनी आपले मार्ग सुधारले नसल्याचे आम्हाला आढळले. छत असलेल्या काही घरांवर टायर ठेवलेले असतात जेणेकरुन वाऱ्याच्या दिवसात छताचे नुकसान होऊ नये. कामगारांना टायर तपासून ते नष्ट करायचे होते. मात्र ते काम होत नसल्याचं आढळून आलं. त्यामुळे आम्ही नोटिसा पाठवण्याचा निर्णय घेतला आणि गरज पडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करू," असं NMMC आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे आणि पावसाळा संपल्यानं आता प्रकरणे कमी होतील. २०१९ मध्ये डेंग्यूचे संशयित रुग्ण २६० होते, तर यावर्षी ते ५७९ इतके नोंदवले गेले.

“डेंग्यूच्या बाबतीत प्रतिबंध आणि पाळत ठेवणं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे ज्यासाठी प्रजनन स्थळांवर फवारणी करणारे कामगार प्रमुख भूमिका बजावतात. याशिवाय, आम्ही सर्व रुग्णालयांना रुग्ण आणि प्रजनन क्षेत्रांवर लक्ष ठेवण्यासाठी नियमितपणे अहवाल देण्यास सांगितलं होतं, ”बांगर पुढे म्हणाले.

सप्टेंबरमध्ये, वाशीतील एका १७ वर्षीय मुलाला डेंग्यू झाल्याचा संशय आला आणि अनेक गुंतागुंतींमुळे त्याचा मृत्यू झाला. आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, संशयित डेंग्यूनं मृत्यूची ही पहिलीच घटना होती परंतु मृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे उशीरा अहवाल मिळाला. ज्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली.

२०१९ मध्ये, मलेरियाच्या रुग्णांची नोंद ३६ होती. तर २०२१ मध्ये ती ३९ झाली. मलेरियाच्या रुग्णांमध्ये फारशी वाढ झाली नसली तरी, डेंग्यूमध्ये ५५% वाढ झाली आहे. आतापर्यंत दोन ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.


हेही वाचा

तापमानात बदल; मुंबईकरांच्या घशातील खवखव वाढली

बीकेसी, चेंबूरमधील हवा सर्वाधिक प्रदूषित

पुढील बातमी
इतर बातम्या