Advertisement

बीकेसी, चेंबूरमधील हवा सर्वाधिक प्रदूषित

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब होऊ शकते.

बीकेसी, चेंबूरमधील हवा सर्वाधिक प्रदूषित
SHARES

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब होऊ शकते. हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणाऱ्या सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) संस्थेनं हा अंदाज वर्तवला आहे.

सफरनुसार, अतिसूक्ष्म कणांची पातळी दिवाळीमध्ये चार नोव्हेंबरच्या रात्री आणि पाच नोव्हेंबरच्या सकाळी २.५ ते १० पीएमपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सहा नोव्हेंबरपासून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याचा अंदाज असला तरी वांद्रे कुर्ला संकुल आणि चेंबूर परिसरात हवेचा स्तर सर्वात वाईट राहणार आहे.

दिवाळी सुरू होण्यापूर्वीच मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळू लागली आहे. काही भागात, हवेची पातळी खराब आणि अत्यंत खराब पातळीवर पोहोचली आहे. माझगाव, बीकेसी, कुलाबा आणि मालाड इथली हवेची गुणवत्ता खराब असल्याचं आढळून आले.

गेल्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे हवेची गुणवत्ता चांगली होती, पण यावेळी सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या काळात हवेची गुणवत्ता खराब ते अत्यंत खराब अशा श्रेणीत असणार आहे.

हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करणार्‍या सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) नुसार, मंगळवारी मुंबईची सरासरी हवेची गुणवत्ता २६६ हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) इतका नोंदवण्यात आला आहे. जो खराब श्रेणीमध्ये येतो.

त्याचप्रमाणे, चार विभागांमधील हवेची गुणवत्ता खराब आणि अत्यंत खराब श्रेणीत आहे. माझगावमध्ये ३५६ एक्यूआय, बीकेसी मध्ये ३१३ एक्यूआय, कुलाबा ३४६ एक्यूआय आणि मालाडमध्ये २२४ एक्यूआयची नोंद करण्यात आली आहे.

फक्त भांडुप आणि वरळी येथी हवा हवेच्या गुणवत्तेमध्ये सामान्य श्रेणीमध्ये असल्याचं आढळून आलं. सफारचे शास्त्रज्ञ गुफ्रान बेग म्हणाले की, प्रदूषणाची पातळी किती जास्त किंवा किती कमी असेल हे आर्द्रता आणि वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा