शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ताबडतोब मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंबंधीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

शरद पवार यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया होणार होती. मात्र आजच पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुढच्या तपासण्या व औषधोपचार इथंच होणार असून परिस्थिती बघून शस्त्रक्रियेबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील, अशी माहिती नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.

रविवारी सायंकाळी शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पवारांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. ब्रीच कँडीमध्ये त्यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्याचं निष्पन्न झालं. 

शरद पवारांना हा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना देण्यात येणारी रक्त पातळ करण्याची औषधे थांबवण्यात आली आहेत. त्यांना ३१ मार्च २०२१ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येणार होतं. तिथं त्यांची एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. सद्यस्थितीत शरद पवार यांचे सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 

(ncp chief sharad pawar admitted again in breach candy hospital mumbai)


हेही वाचा-

नियम न पाळल्यास राज्यात लॉकडाऊन

काँग्रेसच्या टेकूवर ठाकरे सरकार, नाना पटोले संतापले


पुढील बातमी
इतर बातम्या