Advertisement

नियम न पाळल्यास राज्यात लॉकडाऊन, लॉकडाऊनचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत आहे. बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहे. त्यामुळे राज्य सरकार आता कडक लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे.

नियम न पाळल्यास राज्यात लॉकडाऊन, लॉकडाऊनचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
SHARES

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत आहे. बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहे. त्यामुळे राज्य सरकार आता कडक लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे. रविवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.

या महत्वाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   बैठकीत लॉक़डाऊनबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात निर्बंध आणि नियमांचं कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावरही या बैठकीत चर्चा झाली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या. 

बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी एक गंभीर बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिली. राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत, अशी परिस्थिती असल्याचं व्यास यांनी सांगितलं.ते म्हणाले की, सध्या ३ लाख ५७ हजार आयसोलेशन खाटापैकी १ लाख ७ हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. ६० हजार ३४९ ऑक्सिजन खाटापैकी १२ हजार ७०१ खाटा , १९ हजार ९३० खाटापैकी ८ हजार ३४२ खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. ९ हजार ३० व्हेंटीलेटर्सपैकी १ हजार ८८१ वर रुग्णांना  ठेवण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता  कमी पडते आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा