नवी मुंबईतील तुर्भे झोपडपट्टीत मागील १५ दिवसांपासून एकही कोरोना रूग्ण आढळला नाही. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. पालिका प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी घेत मिशन तुर्भे कोरोना मुक्ती राबवल्याने या ठिकाणी कोरोनाचा फैलाव रोखण्यास यश आलं.
सर्वात मोठा झोपडपट्टी म्हणून तुर्भे झोपडपट्टी ओळखली जाते. या ठिकाणी १ लाख लोकसंख्या आहे. तुर्भे झोपडपट्टीत २२ एप्रिलपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण आढळण्यास सुरूवात झाली. येथे आतापर्यंत ४५७ रूग्ण सापडले असून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्यात येथे २६८ रूग्ण तर जुनच्या पहिल्या आठवड्यात १८२ रूग्ण आढळले होते. यानंतर आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार करीत ‘मिशन तुर्भे कोरोना मुक्त’ हातात घेतले. यामध्ये
घरोघरी जात प्रत्येक व्यक्तीची स्क्रिनिंग करण्यात आली. प्रत्येक गल्लीबोळात दिवसातून दोन ते तीन वेळा सॅनिटायझिंग करण्यात येत आहे. सार्वजनिक शौचालयाची दर तासाला स्वच्छता करण्यात आली. महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून प्रत्येक घर पिंजून काढण्यात आले.
वसई, विरार, नालासोपाऱ्यात 'असे' आहेत कंटेन्मेंट झोन
अरे वा ! मास्क न घातल्याप्रकरणी सोमवारी एकही गुन्हा नाही
आता दर ५ मिनिटाला लोकल, कर्मचाऱ्यांना दिलासा