अरे वा ! मास्क न घातल्याप्रकरणी सोमवारी एकही गुन्हा नाही

अशा मास्क न वापरणाऱ्यां आतापर्यंत १८ मार्च ते आतापर्यंत २०७६ जणांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाईचा बडगा उगारला आहे.

अरे वा ! मास्क न घातल्याप्रकरणी सोमवारी एकही गुन्हा नाही
SHARES

मुंबईत कोरोनाचे दिवसेंदिवस नवे रुग्ण समोर येत असल्याने चिंताजनक वातावरण आहे. त्यामुळे शहरात मास्क वापरणे सक्तीचे असताना ही काही बेजबाबदार लोकांकडून मास्क घातले जात नव्हते. अशांवर पोलिसांनी थेट गुन्हे नोंदवण्यास सुरूवात केल्यानंतर सोमवारी पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. सोमवारी मुंबईत मास्क न घातल्या प्रकरणी एक ही नोंदवण्यात आलेला नाही. मास्क न घालणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईसोबतच दंडात्मक कारवाईत ही वाढ करण्यात आलेली आहे. मास्क न घालणाऱ्यांकडून १ हजार रुपये दंड आकण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आलेला आहे.

हेही वाचाः- कोरोनाला टाळण्यासाठी बेस्टची 'क्यूआर कोड'द्वारे भाडं देण्याची सुविधा

मुंबईत सध्या कोरोनाची दहशत असतानाच, खबरदारी म्हणून तोडांला मास्क लावा असे सांगून देखील काही बेशिस्त नागरिक मास्क न वापरता फिरायचे. अशा मास्क न वापरणाऱ्यां आतापर्यंत १८ मार्च ते आतापर्यंत २०७६ जणांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या शिवाय ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी जमणे, कलम १८८ चे उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ११ हजार ६०६ जणांवर गुन्हे नोंदवलेले आहेत. नागरिकांनी गरजे व्यतिरिक्त बाहेर पडू नये, पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकञ जमू नये, तसेच तोंडाला मास्क वापरणे सक्तीचे केले असताना. अनेकदा बेशिस्त नागरिक   या नियमांची पायमल्ली करताना दिसतात. लाँकडाऊनमध्ये शिथिलता देताच अनेक जण रस्त्यावर वाहने घेऊन उतरले.

हेही वाचाः- कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पनवेल एपीएमसी मार्केट बंद

माञ पोलिसांनी वेळोवेळी उचललेल्या पाऊलांमुळे आता त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. ऐरवी दिवसाला  अंदाजे १० हून अधिक गुन्हे मास्क न घालणाऱ्यांविरोधात नोंदवले जात होते. अशांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली. माञ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, कोरोना या महामारीला मुंबईकरांनी गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच सोमवारी मास्क न घातल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एक ही गुन्हा नोंदवल्याचे त्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. तर नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली, तरी पूर्णतहा लॉकडाऊन उठवलेला नाही, त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांनो सावधान, अवैध वाहतूकीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत  राज्यात ८० हजार ५३२ जणांची वाहने आतापर्यंत जप्त केलेली आहेत. सोमवारी २४ तासात तब्बल १६ हजार २९१ वाहनांवर कारवाईकरत ती वाहने जप्त केलेली आहेत. तर लाँकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात १ लाख ३८ हजार ९२२ गुन्हे नोंदवलेले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा