Advertisement

कोरोनाला टाळण्यासाठी बेस्टची 'क्यूआर कोड'द्वारे भाडं देण्याची सुविधा


कोरोनाला टाळण्यासाठी बेस्टची 'क्यूआर कोड'द्वारे भाडं देण्याची सुविधा
SHARES
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण पैशांची देवाणघेवाण करताना हातात ग्लोव्हज घालत आहेत. कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षणासाठी नागरिक काळजी घेत आहेत. अशातच रोख रकमेची देवाणघेवाण टाळण्यासाठी ‘क्यूआर कोड’द्वारे प्रवास भाडे भरण्याची सुविधा बेस्ट उपक्रमाकडून सुरु केली जाणार आहे. या आठवड्यात सर्वच बसगाड्यामध्ये सुरू के ली जाणार आहे. 

या सुविधेसाठी बेस्टच्या वाहकाकडे क्यूआर कोड ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवासी मोबाइलद्वारे कोड स्कॅन करून यूपीआय अ‍ॅपद्वारे प्रवास भाडे भरू शकणार आहे.

नियमित बससेवा सुरू झाल्यानंतर बेस्टची दररोजची प्रवासी संख्या ८ लाख २६ हजारांच्याही पुढे गेली आहे. प्रवास भाडे घेताना चालक-वाहकांचा प्रवाशांशी संपर्क येतो. रोख रक्कम स्वीकारताना कोरोना संसर्गाचा धोका कायम असतो. ही देवाणघेवाण टाळण्याकरिता क्यूआर कोडद्वारे प्रवास भाडे भरण्याची सुविधा आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

१६ जूनपासून वडाळा आगारांतर्गत आणि २६ जूनपासून कुलाबा आगारांतर्गत काही मोजक्याच बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात आली. त्याचा प्रतिसाद चांगला असल्यानं या आठवड्यात बेस्टच्या सर्व आगारातील बसमध्ये सुविधा राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

’फोन पे, गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, पेएटीएम, एचडीएफसी पेझॅप, एअटेल पेमेन्ट बँक अशा यूपीआय अ‍ॅपमधील क्यूआर कोड पद्धतीच्या सहाय्याने प्रवाशांना प्रवास भाडं भरता येणार आहे. बस वाहकाकडे क्यूआर कोड असलेले ओळखपत्र आहे. प्रवाशानं प्रवासाची माहिती दिल्यानंतर वाहक प्रवास भाडे सांगणार आहे. यानंतर प्रवासी आपल्या मोबाइल मधून वाहकाकडील क्यूआर कोड स्कॅन करून कोणत्याही एका यूपीआय अ‍ॅपद्वारे भाड्याची रक्कम अदा करणार आहे.

ही रक्कम भरताच प्रवाशाच्या मोबाइलवर अदा केलेली रक्कम, बस वाहकाचा परिचय क्रमांक आणि आगार प्रदर्शित होणार आहे. वाहकाने या माहितीची खात्री केल्यानंतर प्रवाशाला तिकीट दिलं जाणार आहे.

बस वाहकाचा कामकाजाचा कार्यकाळ संपताच तिकीट व रोख रक्कम आगारात जमा करताना संबंधित रोखपाल त्याच्या संगणकावर उपलब्ध असलेली माहितीद्वारे वाहकाने क्यूआर कोडद्वारे विकलेल्या तिकिटांची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम वाहकाकडून जमा करून घेणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा