Advertisement

कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पनवेल एपीएमसी मार्केट बंद

कोरोना के मामले में बढो़त्तरी देख लिया गया फैसला

कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पनवेल एपीएमसी मार्केट बंद
SHARES
Advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा अनेक सुविधांना बंदी घातली जात आहे. तसंच, वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेकांनी कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पनवेल एपीएमसी मार्केट सरकारच्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं स्थानिक रहिवाशांना मोठ्या त्रासाला समोरं जावं लागणार आहे.

एपीएमसी मार्केट बंद करण्यात येणार असल्यामुळं स्थानिकांना भाजीपाला, मासे, मटण व नॉनवेजच्या खरेदीसाठी गैरसोय सहन करावी लागणार आहे. मागील काही दिवसांपासून सतत पनवेल परिसरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. दररोज ८० ते ९० जणांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळं ही परिस्थिती लक्षात घेता सोमवारी रात्री आदेश काढत एपीएमसी मार्केट कोळीवाड्यातील दुकानं सरकारचे पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर पनवेल मधील या गर्दीच्या ठिकाणी अनेक जण फिरत होते. परिणामी यामुळं रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे, अशी माहिती पीएमसीच्या एका अधिकाऱ्यानं दिली. 'आम्ही नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक केलं होतं', असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement