Advertisement

आता दर ५ मिनिटाला लोकल, कर्मचाऱ्यांना दिलासा


आता दर ५ मिनिटाला लोकल, कर्मचाऱ्यांना दिलासा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मंगळवार या लॉकडाऊनचा ५ व टप्पा संपणार आहे. त्यामुळं राज्यातील विशेषत: मुंबईतील कंपन्या व कारखाने सुरु करण्यात आले आहेत. तसंच, अनेक कर्मचारी देखील आपली हजेरी लावत आहेत. त्यामुळं या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनानं लोकल सुरु केली. परंतु, कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची वाढलेली हजेरी लक्षात घेता रेल्वेनं लोकलच्या संख्येत वाढ केली आहे. रेल्वे स्थानकात १५ ते २० मिनिट उशिरा येणारी लोकल आता दर ५ मिनिटाला येणार आहे.

स्थानकात दर ५ मिनिटाला लोकल येणार असल्यानं अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. याआधी उशीरा येणाऱ्या लोकलमुळं स्थानकत प्रवाशांची काहीशी गर्दी जमायची. त्यामुळं लोकलमध्ये गर्दी होऊन सामाजिक अंतरच्या नियमाचं उल्लंघन होत होतं. मात्र, आता प्रवास सुखाचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईतील कार्यालयांमध्ये सुरुवातीला १० टक्के कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. परंतु, अधिकारी आता ३० टक्के कर्मचारी वाढविण्याच्या विचारात आहेत. तसंच लवकरच मॉल आणि बाजार उघडण्याच्याही विचारात असल्याच संरक्षक मंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा