मिरा-भाईंदरमध्ये घरातील विलगीकरण बंद, 'हे' आहे कारण

मीरा-भाईंदर शहरात रोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची सौम्य आणि मध्यम लक्षणे असेलल्या रुग्णांना यापुढे घरात विलगीकरणात न ठेवण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महापालिकेने घेतला आहे. घरात विलगीकरणात असलेले रुग्ण घराबाहेर पडत असल्याने कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात मंगळवारी १६२ नवीन रुग्ण सापडले. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ४६३३ झाली आहे. तर एकूण मृतांचा आकडा १७२ वर गेला आहे. या ठिकाणी रोज सरासरी नवीन दीडशे रुग्ण आढळत आहेत. बहुतांशी कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असतात. अशा रुग्णांना केंद्र शासनाच्या नव्या नियमावलीनुसार घरातच अलगीकरण करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, 

अनेक रुग्ण घराबाहेर पडत असल्याच्या तक्रारी पालिकेकडं आल्या आहेत. तसंच रुग्णावर सात दिवस लक्ष ठेवण्याची गरज असते. कारण रुग्णांची ऑक्सिजन पातळी खाली येऊन प्रकृती बिघडण्याची शक्यता असते. याशिवाय हे रुग्ण घराबाहेर पडत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरी विलगीकरण नकरण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला.


हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे ८०६ नवे रुग्ण, ६४ जणांचा दिवसभरात मृत्यू

violating lockdown in Maharashtra नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ लाख ५४ हजार जणांवर गुन्हे दाखल


पुढील बातमी
इतर बातम्या