कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या २६ हजारांच्या वर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या आता २६ हजारांच्या वर गेली आहे. रविवारी पालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन २१८ रुग्ण आढळले आहेत. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे.  

२५४ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २६,६२३ झाली आहे. यामध्ये ३१८४ रुग्ण उपचार घेत असून २२,८८३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ५५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व  ४०, कल्याण प. ६२, डोंबिवली पूर्व ६४, डोंबिवली प ४०, मांडा टिटवाळा ८, तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८७ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, २ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा-

Ganpati festival 2020 Live: घरातूनच घ्या बाप्पाचं ऑनलाईन दर्शन 

गणेशोत्सव काळात गर्दी होता कामा नये- मुख्यमंत्री


पुढील बातमी
इतर बातम्या