मुलुंड, घाटकोपर, भांडुप परिसरात आता रुग्णदुपटीचा कालावधी कमी झाल्याचं दिसून आलं आहे. या भागात आतापर्यंत मर्यादित रुग्णसंख्या होती. मात्र, येथील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. भायखळा, अंधेरी पश्चिम, ग्रॅन्ट रोड, एल्फिन्स्टन परिसरात मात्र, रुग्णदुपटीचा कालावधी हळूहळू वाढल्याचं दिसून आलं आहे. आहे.
१८ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, दहिसरमध्ये सर्वात कमी म्हणजे १६०, सॅण्डहस्र्ट रोडमध्ये २८१, मुलुंडमध्ये ३०८, गोरेगावमध्ये ४०६, भांडुपमध्ये ५५५, घाटकोपरमध्ये ५७२ रुग्ण आढळले होते. या भागात रुग्णसंख्या कमी आहे. मात्र, येथील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी झाल्यामुळे चिंता वाढली आहे. मुलुंड आणि घाटकोपरमधील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी सात दिवसांवर आला आहे. तर भांडुपमध्ये हा कालावधी आठ दिवसांचा आहे. दहिसर, सॅण्डहर्स्ट रोड आणि गोरेगावमधील रुग्णदुपटीचा कालावधी नऊ दिवसांवर आला आहे.
दादर, माहीम, धारावी (जी-उत्तर) विभागात १८ मे रोजी सर्वाधिक म्हणजे १८६८ रुग्ण होते. या भागातील रुग्णदुपटीचा कालावधी १२ दिवस आहे. तर भायखळ्यातील रुग्णसंख्या या दिवशी १६५८ वर होती. मात्र येथील रुग्णदुपटीचा कालावधी १८ दिवसांवर गेला आहे. अंधेरी पश्चिम भागातील रुग्णदुपटीचा कालावधी १८ दिवस तर माटुंग्यामधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६ दिवसांवर आला आहे. मरिन लाइन्स (रुग्ण संख्या १८८), मालाड (४१४), कुलाबा (५६०), कुर्ला (१३१९), माटुंगा (१६४३) या भागातील रुग्णदुपटीचा कालावधी १२ दिवसांवर आला आहे. तर वांद्रे (४४०), चेंबूर (६६४), अंधेरी पूर्व (१००३) या भागातील रुग्णदुपटीचा कालावधी १३ दिवसांवर आला आहे.
एच-ई विभागातही कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. वांद्रे-कु र्ला कॉम्प्लेक्स, कलानगर, निर्मलनगर, बेहरामपाडा हा परिसर या विभागात येतो. या भागात १,१३८ रुग्ण आढळून आले आहेत. ९-१० दिवसांत येथे ६०० हून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत.
खासगी नर्सिंग होम, रुग्णालय सुरू न केल्यास होणार कारवाई
नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर